Political Kisse

मिरची वरील चूरडामुरडा व्हायरस आणि पांढरी माशी नियंत्रण – chilli virus and white fly control

मिरची वरील चूरडा-मुरडा व्हायरस आणि पांढरी माशी नियंत्रण

महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये मिरचीचे पीक घेतले जाते. वाळलेल्या व हिरव्या मिरच्यासाठी साधारणतः जून ते मार्च या कालावधी मध्ये  मिरचीचे पीक घेतले जाते. परंतु गेल्या काही  वर्षापासून मिरची वरील चूरडा-मुरडा हा रोग व पांढ-या माशीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहे .

मिरची वरील चुरडा मुरडा व्हायरस

 

मोठ्या प्रमाणात फवारण्या करुनही मिरची वरील चूरडा-मुरडा व्हायरस आणि पांढरी माशी नियंत्रण होऊ शकले नाहीं  काही वर्षापासून या मुळे  कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. चूरडा-मुरडा व्हायरस या विषाणूजन्य रोगामुळे शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर पडून वेडीवाकडी वरखाली वळलेली दिसतात रोगग्रस्त झाडाला फुले कमी लागतात किंवा फुले लागणेसुद्धा बंद होते.

फळे लागली तरी ती कमी आकाराची असतात. झाडाची वाढ खुटते. या रोगाची सुरुवात काहीवेळा रोपवाटिकेत पांढ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे होते. प्रादुर्भाव झालेली रोपे निरोगी रोपासारखीच दिसतात. अशी रोगग्रस्त रोपें जेंव्हा आपण शैतात लावतो तेव्हा या रोपावर रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा फुले व फळे यायला लागतात, त्यावेळी झाडाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि रोगाची लक्षणे दिसू लागतात. रस शोषण करणाया किडींमुळे हा रोग पसरत जातो व त्यात महत्वाची भूमिका बजावतात त्या पांढ-या माशा.

शेतक-यांशी चर्चा केली असता पुढील बाबी निदर्शनास आल्या. मिरची वरील चूरडा-मुरडा व्हायरस आणि पांढरी माशी नियंत्रण

  1. जीब्रोलिकअसिड इत्यादीसारखी वाढ़संवधके व रासायनिक किंटकनाशकांचे विविध प्रमाणातील मिश्रण मिरचीवर अनेकवेळा फवारले आहे.
  2. अनेक शेतक-यांनी अशा प्रकारची फवारणी प्रत्येक ३ ते ५ दिवसानंतर घेतली आहे.
  3. गरज नसताना अनेक शेतक-यांनी रासायनिक बुरशींनाशकांची पण फवारणी घेतली होती.
  4. अनेक शैतामध्ये शास्त्रज्ञांना पांढ-या माशीची संख्या मोठ्या प्रमाणात (५0-100 प्रति झाड़) देिसून आली
  5. याचबरोबर नत्र्युक्त खतांच्या मात्रा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या होत्या. यामुळे मिरचीची शाखीय वाढ जास्तप्रमाणात झाली व त्यामुळे पांढ-या माशांची संख्या वाढण्यास मदत झाली. मिरचीवर वाढ संप्रेरके वापरल्यामुळे मिरचीचे झाड अधिक लुसलुशीत हिरवेगार झाले आणि त्यामुळे पांढ-या माशा त्याकडे जास्तप्रमाणात आकर्षण झाल्या आणि त्याचे प्रजोत्पादनपण वाढत गेले.
  6. रासायनिक किटकनाशकांच्या अति वापरामुळे तुरळक मित्रकेिडी दिसून आल्या.
  7. कीटकनाशक विक्रेत्यांच्या सल्ल्यावरुन शेतक-यांनी ह्युमिक असिड देखील फवारले.

मिरची वरील चूरडा-मुरडा व्हायरस आणि पांढरी माशी नियंत्रण आणि व्यवस्थापन

पांढरी माशी आपला जीवनक्रम ३० दिवसात पूर्ण करत असत पांढऱ्या माशीची पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात . तसेच पांढऱ्या माशीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या पारदर्शक चिकट द्रव्यावर काळी बुरशी वाढत असते. हि कीड पर्णगुछ या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते . यजमान वनस्पतीवर पांढरी माशी आपली अंडी घालत असते, त्यामुळे ते नष्ट करणे आवश्यक ठरते.पांढरी माशी आपला जीवनक्रम ३० दिवसात पूर्ण करत असत पांढऱ्या माशीची पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात . तसेच पांढऱ्या माशीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या पारदर्शक चिकट द्रव्यावर काळी बुरशी वाढत असते. हि कीड पर्णगुछ या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते . यजमान वनस्पतीवर पांढरी माशी आपली अंडी घालत असते, त्यामुळे ते नष्ट करणे आवश्यक ठरते.

मिरची वरील चूरडा-मुरडा व्हायरस आणि पांढरी माशी नियंत्रण आणि रोग व किंडींचे व्यवस्थापन

  1. मिरची वरील चूरडा-मुरडा व्हायरस आणि पांढरी माशी नियंत्रण साठी  प्रति एकी ३५ पिवळे चिकट सापळे लावावेत .
  2. फुलकीडीच्या  नियंत्रणासाठी प्रतेि एकी ३५ निळे चिकट सापळे लावावेत .
  3. शेताच्या चोहोबाजूंनी तीन ओळीमध्ये मका , चावली व झेंडू लावावा . हा मका वाढल्यानंतर शेतीभोवती कुंपण तयार होते. यामुळे बाहेरील कीड आत येण्यास मज्जाव होतो. मका फुलातील प्रग खाण्यासाठी मित्रकीटक उदा.क्रायसोपा , लेडीबर्ड बीटल,कोळी , ट्रायकोड्रामा इत्यादी येतात . हे कीटक मक्यावर आलेल्या किडींना खातात . या सजीव कुंपणामुळे मित्रकीटकांचे संवर्धन होऊन रसशोषक किडींच्या नियंत्रणास मदत होते.
  4. रोपे  तयार करतानारोपवाटिकेच्या  चारी बाजूने नेट/कपडा बांधावा .यामुळे बाहेरील रस शोषण करणाऱ्या किडी रोपवाटिकेमध्ये घुसण्यास मज्जाव होतो.
  5. रोगग्रस्त झाडे दिसताच ती उपटून नष्ट करावीत . कारण रोगग्रस्त झाडापासून निरोगी झाडांना विषाणूची लागण होते. किडीमार्फत होणारा प्रसार रोखणे हाच एक उपाय आहे.
  6. लागवडीवेळी इमिडाकलोप्रीड १ मी.ली.+कार्बेंडझिम १ ग्रॅम + ट्रायकोडमा ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या द्रावणात रोपाची मुळे बुडवून नंतर लागवड करावी.
  7. पुनर्रलागवडीनंतर पहिली फवारणी सायपरमेथ्रीन  ४ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यातून करावी . त्यानंतर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात . फवारणीसाठी कीटकनाशके आलटून पालटून वापरावीत.
  8. व्हर्टीसिलियम लेक्यानि किंवा मेटारायझिम अॅनोसोपली या जैविक कीटकनाशकाची  ५ मी.ली. प्रती लिटर पाण्यामधून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.
  9. पांढरा, पिवळा ,कला,किंवा निळ्या रंगाच्या प्लास्टिक मल्चिंगने पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते
  10. बीजप्रक्रिया केली नसल्यास वाफ्यात (दोन * एक मीटर ) रोपे उगवल्यानंतर दोन ओळीत फोरेट दाणेदार २० ग्रॅम टाकावे किंवा रोपे उगवल्यानंतर डायमिथोएट १० मी.ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *