योजना

धुळे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत धक्कादायक ट्विस्ट: 1 चूक, आणि पैसे कराव लागले परत

धुळे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतील धक्कादायक ट्विस्ट: एक चूक, पैसे परत, आणि नवा मार्ग

धुळे जिल्ह्यात एका महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पैसे चुकून तिच्या मुलाच्या खात्यात आल्यावर स्वतःहून ते परत केले. महिलेला आधार कार्डात गडबड होऊन तिच्या मुलाच्या खात्यात पैसे आले, हे लक्षात आल्यानंतर तिने प्रशासनाला कळवून पैसे परत केले. नंतर योग्य पद्धतीने अर्ज करून ती योजनेचा फायदा घेऊ शकली. (लाडकी बहीण)

धुळ्यात लाडकी बहीण योजनेत मोठा ट्विस्ट
धुळ्यात लाडकी बहीण योजनेत मोठा ट्विस्ट

विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या सत्तेवर येताच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना पुन्हा चर्चेत आली. योजनेच्या अर्जांची फेरपडताळणी केली असता, धुळे जिल्ह्यात एक महिलेने या योजनेचा अपात्र लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. त्या महिलेच्या 7500 रुपये परत घेतले गेले होते.

ती एक चूक घडली, पण समोर येऊन केले पैसे परत

पण याप्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. भिकूबाई खैरनार नावाच्या महिलेने सांगितले की, तिने चुकून मुलाचे आधार कार्ड दिले, ज्यामुळे पैसे मुलाच्या खात्यात जमा झाले होते. हे लक्षात आल्यानंतर तिने प्रशासनाकडे कळवून पैसे परत केले. प्रशासनाने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. यानंतर भिकूबाईने योग्य पद्धतीने अर्ज केला आणि (लाडकी बहीण) 4500 रुपये लाभ म्हणून मिळवले आहेत.

भिकूबाई खैरनार आणि त्यांचा मुलगा योगित यांनी सांगितले की, ‘आम्ही जेव्हा आईचा अर्ज भरला, तेव्हा चुकून मुलाचे आधार कार्ड दिले. फॉर्म सबमिट केल्यानंतर आम्हाला पैसे मिळाले, पण ते आईच्या खात्यात नाही, तर मुलाच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर आम्हाला चूक लक्षात आली आणि आम्ही पैसे परत केले.’

नंतर पुन्हा केला अर्ज

योगित खैरनार यांनी माध्यमांना सांगितले की, ‘चुकून पैसे आले, पण आम्हाला ते स्वीकारण्याचे योग्य वाटले नाही. त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन ते परत केले. त्यानंतर आम्ही आईसाठी पुन्हा अर्ज केला आणि योग्य कागदपत्रांसह त्यांना 4500 रुपये मिळाले.’

अशाप्रकारे, या महिलेने स्वतःच चूक कबूल करून योग्य प्रक्रिया पूर्ण केली आणि योजनाचा योग्य लाभ घेतला.