NewsPolitics

अनिल देशमुख यांची संपूर्ण माहिती Anil Deshmukh Property, Lifestyle, Mobile Number, Biography in Marathi

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा प्रवास हा अपक्ष आमदार ते राष्ट्रवादीचे मंत्री असा राहिला आहे. सध्या ते 70 वर्षाचे आहेत. त्यांनी एम.एसस्सीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. नागपूरमधील काटोल( katol Consituency) हा त्यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून ते पाचवेळा निवडून आले आहेत. स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू समजले जातात. शेतकरी, बहुजनांसाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

Image is demonstration purpose only

अनिल देशमुख यांची वैयक्तिक माहिती Anil Deshmukh Personal Information
नाव अनिल वसंतराव देशमुख
मतदार संघ काटोल (नागपूर)
पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस
जन्मतारीख 9 मे 1950
पत्ता वडवीहिरा, पोस्ट. दातेवाडी ता.नरखेड जि.नागपूर
इमेल deshmukhv09@gmail.com
संपर्क क्र 7122 52 4989
व्यवसाय शेती व व्यावसायिक
गुन्ह्याची नोंद 8

चला तर जाणून घेऊया, वादात सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख याचं शिक्षण किती झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एकूण मालमत्ता किती आहे?

अनिल देशमुख यांच्या शिक्षणा विषयी माहिती Educational Details:

  • Msc agriculture
  • 1973 मध्ये
  • कृषी महाविद्यालय, नागपूर

आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न Total Details shown in ITR

  • 2018 – 2019 ~ 16 Lacs+
  • 2017 – 2018  ~  32  Lacs+
  • 2016 – 2017  ~  15 Lacs+
  • 2015 – 2016  ~  14  Lacs+
  • 2014 – 2015 ~ 8 lacs+

Image is demonstration purpose only

जंगम मालमत्तेचा तपशील Details of movable Property :

  • कॅश –  3 Lacs+
  • बँका डिपॉझिट – 7 Lacs+
  • कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर – 3 Lacs+
  • इन्शुरन्स –  2 Lacs+
  • ज्वेलरी –  29 Lacs+

एकूण जंगम मालमत्ता –  1 Crore+

Image is demonstration purpose only

अचल मालमत्तेचा तपशील Details of immovable property :

  • शेतजमीन –  1 crore+
  • बंजर जमीन – 4 crore+
  • व्यावसायिक इमारती – 2 crore+
  • निवासी इमारती – 5 Crore+

एकूण अचल संपत्ती – 12  Crore+

देशमुख यांची एकूण मालमत्ता :

  • देय – 4 crore+
  • उत्पन्नाचे स्रोत – शेती व व्यवसाय

एकूण मालमत्ता – 14 Crore+

भूषविलेली मंत्रिपदे

  • 1995 – कॅबिनेट मंत्री, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य (युती सरकार)
  • 1999 – राज्यमंत्री, शालेय शिक्षण, माहिती वजनसंपर्क (आघाडी सरकार)
  • 2001 – कॅबिनेट मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषधीद्रव्य प्रशासन (आघाडी सरकार)
  • 2004 – कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक बांधकाम (आघाडी सरकार)
  • 2009 – कॅबिनेट मंत्री, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण (आघाडी सरकार)
  • 2019 – कॅबिनेट मंत्री, गृहमंत्री ( महाविकासआघाडी )

Image is demonstration purpose only

राजकीय कारकीर्द |  Political Carrier
नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळल्यानंतर देशमुख यांनी 1995मध्ये अपक्ष निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. पहिल्याच टर्ममध्ये युती सरकारमध्ये ते मंत्रीही झाले. देशमुखांकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य या खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन 1999मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी अनिल देशमुख यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी लगेच 1999मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर काटोलमधून निवडणूक लढवली आहे. विजयी झाले. त्यानंतर 2004मध्येही याच मतदारसंघातून त्यांनी विजयाची हॅट्रीक मारली.  2014ची विधानसभा निवडणूक अनिल देशमुखांसाठी ही सर्वात टफ होती. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात काटोलमधून आशिष देशमुख होते. आशिष देशमुख हे त्यावेळी भाजपमधून काटोलमधून लढले होते. देशमुख विरुद्ध देशमुख अशी ही लढत नागपूरमध्ये चांगलीच गाजली होती. मात्र, या निवडणुकीत अनिल देशमुख यांनी सहज विजय मिळविला. त्यानंतर 2019च्या निवडणुकीतही राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट देण्यात आले आणि देशमुखांनी या निवडणुकीतही बाजी मारली.

देशमुख पहिल्यांदा 1995मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले. अपक्ष आणि पहिल्याच टर्मचे आमदार असूनही युती सरकारमध्ये त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर देशमुख यांनी मागे वळून पाहिलं नाही. 2014 ते 2019 हा काळ वगळल्यास देशमुख यांच्याकडे कायम मंत्रिपद राहिलंय. राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी देण्यात आली. 1999 ते 2001 या काळात शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क विभागाचे राज्यमंत्रिपद, 2004 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यानंतर 2009 मध्ये अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार त्यांनी सांभाळला. सध्याचे महाविकास आघाडी मध्ये ते राज्याचे गृहमंत्री होते परंतु, मनसुख हिरे हत्या प्रकरण आणि 100 कोटी खंडणी वसुली च्या आरोप प्रकरणी त्यांना त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि आता त्यांच्यावर सीबीआय ची चौकशी सुद्धा चालू आहे.


हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *