योजना

इंडिया vs ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण ?

अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय विश्वातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. तसेच क्रिकेट चाहतेही उत्सुक आहे. या महाअंतिम सामन्यासाठी चाहत्यांनी शनिवारीच अहमदाबादमध्ये हजेरी लावलीय. या सामन्याला दुपारी 2 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात आला. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला. कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही टीम अनचेंज

या महामुकाबल्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ऑस्ट्रेलियाने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवलाय. तर टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार मोहम्मद शमी याच्या जागी आर अश्विन याचा समावेश करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र कॅप्टन रोहितने या सर्व चर्चा फक्त चर्चाच ठरु दिल्या आहेत. रोहितने कोणताही बदल अंतिम 11 खेळाडूंमध्ये केलेला नाही.

IND vs AUS Final Toss | ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?