Political Kisse

Monkeypox : सावधान, भारतातही मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला आहे .

Monkeypox : अलीकडेच भारतातही मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण आढळून आला आहे,त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.

Monkeypox : सावधान

मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव जगभर वेगाने पसरत आहे. आफ्रिकेतून उगम झाल्यानंतर हा विषाणू युरोप आणि अमेरिकेत पोहोचला आहे. आता भारतही या जागतिक आरोग्य संकटापासून अस्पर्श राहिलेला नाही. अलीकडेच देशात मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण (Monkeypox First Case Of India) समोर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुष्टी केली आहे की, एका व्यक्तीमध्ये या विषाणूच्या संसर्गाशी संबंधित लक्षणे दिसून आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ती व्यक्ती नुकतीच परदेशातून परतली होती, त्यामुळे प्रकरण उघडकीस येताच, रुग्णाला तात्काळ वेगळे करून आवश्यक चाचण्यांसाठी पाठवण्यात आले.

Monkeypox : मागील काही वर्षात कोरोनाने (Corona) थैमान घातले होते, त्यानंतर आता मंकीपॉक्स विषाणूने अवघ्या जगभरात थैमान घातल्याचं चित्र समोर येतंय. धक्कादायक बाब अशी की, भारतातही मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण आढळून आला आहे. परदेशातून परतलेल्या तरुणामध्ये हा विषाणू असल्याचा संशय आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून ब्लड रिपोर्टची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, मंकीपॉक्स कसा पसरतो? शरीरावर कोणती लक्षणे दिसतात आणि प्रतिबंध कसा करता येईल हे आम्ही तुम्हाला सांगतो

मंकीपॉक्स कसा पसरतो चला बघुया

मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य रोग आहे. जो प्रामुख्याने संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याशी थेट संपर्क साधून पसरतो. हा रोग संक्रमित व्यक्तीच्या जखमा, द्रव किंवा संक्रमित सामग्रीच्या संपर्कातून देखील पसरू शकतो. नुकत्याच झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत, हे उघड झाले की, मंकीपॉक्सचा संसर्ग सामान्यतः 2 ते 4 आठवड्यांपर्यंत असतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, रुग्णांना फक्त सामान्य काळजी आणि पुनर्प्राप्तीची आवश्यकता असते. हा रोग प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातून, विशेषत: लैंगिक संबंधादरम्यान किंवा संक्रमित व्यक्तीच्या जखमांशी थेट संपर्काद्वारे पसरतो.

रुग्णाची प्रकृती कशी आसते ?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संशयित रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) येथे रुग्णाचे नमुने तपासले जात आहेत. चाचणीचे निकाल आल्यानंतरच मंकीपॉक्सची पुष्टी होईल. मंत्रालयाने सांगितले की, या प्रकरणाबाबत सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी देश पूर्णपणे सक्षम आहे. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला मंकीपॉक्सची लक्षणे आणि त्याच्याशी संबंधित प्रतिबंधात्मक उपायांबद्दल सांगत आहोत.

रुग्णांमध्ये खालील लक्षणे दिसू शकतात.

  • श्वास घेण्यात अडचण
  • गिळण्यात अडचण
  • डोळ्यांत सूज येण

    मंकीपॉक्सची लक्षणे खालील प्रमाणे असतात

    मंकीपॉक्सची लक्षणे संसर्गानंतर साधारणपणे 5 ते 21 दिवसांत दिसतात.

    • ताप
    • डोकेदुखी
    • स्नायू दुखणे
    • पाठदुखी
    • थंडी जाणवणे
    • थकवा
    • वेदनादायक पुरळ उठणे
    • सुजलेल्या लिम्फ नोड्स

      आश्या वेळेस डॉक्टरांना कधी भेटायचे ?

      • मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावे.
      • मंकीपॉक्स टाळण्यासाठी उपाय
      • संक्रमित जनावरांपासून दूर राहा.
      • संक्रमित लोकांशी जवळचा संपर्क टाळा.
      • साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा.
      • सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *