Political Kisse

माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपये मिळणार ? फॉर्म कसा भरायचा ?

महाराष्ट्रमाझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपये कोणाला मिळणार ? त्याचा फॉर्म कसा भरायचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार

May be an image of 2 people and text

mukhyamantri majhi ladki bahin yojana how to fill the form and who is eligible for this scheme

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. पण या योजनेचा लाभ कसा घेणार आणि कोणाला घेता येणार? तसेच, या योजनेसाठी अर्ज कसा कोणाकडे करायचा? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडले असतील. त्यासाठीच पुढील माहिती.

लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुमारे एक कोटी महिलांना घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी वर्षाला 2 लाख 50 हजार 500 रुपये पेक्षा कमी आवक असा निकष आहे. राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलीय.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता
लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखांपर्यंत असणे अनिवार्य) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशनकार्ड सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.

या तारखेपासून अर्ज करता येईल?
1 जुलै 2024 अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होईल. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस 15 जुलै 2024 आहे. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024 तात्पुरत्या यादीवरील तक्रार/ हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै आहे. अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 आहे. लाभार्थ्यांचे बँकमध्ये E-KYC करणे 10 ऑगस्ट 2024 लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024 त्यानंतरच्या महिन्यांत देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत

कोण अपात्र असेल?
या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही, हेही सरकराने स्पष्टपणे नमूद केलंय. ज्यांच्या कुटूंबाचे एकत्रिक वार्षिक उत्पन्न रु.2 .50 लाखांपेक्षा अधिक आहे. ज्याच्या कुटूंबातील सदस्य आयकरदाता आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

May be an image of ‎temple and ‎text that says "‎आरोग्याची वारी. पंढराच्या रीच्या दारा। वारीची भव्यता, सार्वजनिक आरोग्य विभागाची सज्जता दि. २८ जून २०२४ पर्यंत एकूण ३०,५९८ वारकऱ्यांनी घेतला मोफत आरोग्य सेवेचा लाभ सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा ل आरोग्य तपासणी उपवार لا आरोग्य दुतामार्फात भरोग्य सेवा لا १०२ 9oc रुग्णवाहिका لا प्रथमोपचार संदर्भ सेवा आपत्कालीन सेवा आरोग्य शिक्षण 7 हिरकणी कक्ष विनम्र आवाहन सर्व वारकरी आणि भाविकांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा! सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन 有‎"‎‎

Who will get 1500 rupees per month from Maharashtra My Beloved Sister Yojana? How to fill the form under the Chief Minister Majhi Ladki Bahin scheme, the government will give 1 thousand 500 rupees per month to women aged 21 to 60.

mukhyamantri majhi ladki bahin yojana how to fill the form and who is eligible for this scheme

State Finance Minister Ajit Pawar announced Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana. Under this scheme, the government will give Rs 1,500 per month to women aged 21 to 60. Government of Maharashtra has launched this important scheme to make women and girls of Maharashtra self-reliant and independent. But how and who can benefit from this scheme? Also, how to apply for this scheme? Common citizens may have many such questions. Further information for that.

What exactly is Ladaki Baheen Yojana? Around one crore women will be able to take the benefit of Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana. Under this scheme, eligible women in the age group of 21 to 60 will be given 1500 rupees per month through the government. For this the criteria is income less than 2 lakh 50 thousand 500 rupees per annum. An important plan of the state government has been announced to make the women and girls of the state self-reliant, self-sufficient, and to improve the health and nutritional status of women and their dependent children.

Eligibility of beneficiaries of the scheme
The beneficiary woman must be a resident of Maharashtra state. Married, divorced, abandoned and destitute women in the state. Till completion of minimum age of 21 years and maximum age of 60 years. Beneficiaries applying for benefits under the scheme must have a bank account. The annual income of the beneficiary family should not exceed 2.50 lakhs. For the benefit of this scheme, the following documents are required to apply online for the benefit of the scheme. Beneficiary’s Aadhaar Card Maharashtra State Domicile Certificate or Maharashtra State Birth Certificate Income Certificate of Head of Family issued by Competent Authority (Annual Income must be up to Rs.2.50 Lakhs) Scanned Copy of First Page of Bank Account Passbook Passport Size Photo Ration Card Undertaking to comply with the terms and conditions of the scheme

How is the application process?
The entire application process will be free. Scheme applications can be filled online through portal/mobile app/Setu Suvidha Kendra. For that the following process has to be done. Eligible women can apply online for this scheme. For those women who are not able to submit the online application, the facility to fill the application will be available at Anganwadi Centres/Child Development Project Officer Offices (Civil/Rural/Tribal)/Gram Panchayat/Ward/Setu Suvidha Kendra. The above filled form will be entered online by designated staff in Anganwadi Kendra/Child Development Project Officer Offices (Urban/Rural/Tribal)/Setu Suvidha Kendra and proper acknowledgment will be issued for each successfully filed application. The female applicant herself will need to be present at the above location so that her photograph can be taken live and E-KYC can be done. For this the woman must bring the following information.

Can I apply from this date?
1 July 2024 will start receiving applications. Last date for receipt of applications is 15 July 2024. Provisional list publication date 16th July 2024 Period for receipt of complaints/objections on provisional list is 21st July to 30th July. The final list release date is 1st August 2024. E-KYC of Beneficiary with Bank 10th August 2024 Beneficiary Fund Transfer 14th August 2024 Due date in subsequent months by 15th of each month

Who will be disqualified?
The government has also clearly mentioned that no one will get the benefit of this scheme. Whose combined annual family income is more than Rs.2.50 lakhs. Whose family member is an income tax payer. Whose family members are working as regular/permanent employees/contractual employees in a Government Department/Undertaking/Board/Government of India or a local body of a State Government or are drawing pension after retirement. But outsourced and voluntary workers and employees will not be disqualified. The said beneficiary woman has benefited more than Rs.1,500/- through the financial scheme implemented through other government departments. Whose family member is a current or former MP/MLA. Whose family member is Chairman/Vice-Chairman/Director/Member of Board/Corporation/Board/Undertaking of Government of India or State Government. whose family members jointly own more than five acres of agricultural land. Those who have four wheelers (excluding tractors) registered in the name of their family members. If there is a need to amend the “eligibility” and “ineligibility” criteria of the said scheme, action will be taken with the approval of the government after taking the feedback of the planning and finance department.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *