NewsPolitics

प्रकाश आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Prakash Ambedkar Property, Lifestyle, Mobile Number, Biography in Marathi

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडरकर यांचे नातू म्हणजेच प्रकाश(बाळासाहेब)यशवंत आंबेडकर.सुरवातीला (इ.स.१९९४ पूर्वी) भारतीय रिपब्लिक पक्षात प्रकाश आंबेडकर होते. त्यांनतर त्यांनी (४ जुलै १९९४ रोजी) भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली व त्याचे अध्यक्ष झाले.प्रकाश आंबडेकर हे पहिल्यांदा ( इ.स.१९९० ते १९९६) लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. अकोला लोकसभा मतदारसंघातून (इ.स. १९९८ ते १९९९ पर्यंत) मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार १२व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडूण आले त्यानंतर याच मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा (इ.स. १९९९ ते २००४ पर्यंत) मध्ये भारिप बहुजन महासंघ पक्षाचे उमेदवार म्हणून १३व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडूण आले.

प्रकाश आंबेडकर हे १२व्या व १३व्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा संसद सदस्य (खासदार) म्हणून निवडून आले होते. दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य (खासदार) राहिलेले आहेत. २०१८ मध्ये त्यांनी सुमारे १०० लहान-मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र घेत वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना केली.

Image is demonstration purpose only

प्रकाश आंबेडकर यांची वैयक्तिक माहिती  Prakash Ambedkar Personal Information 
नाव प्रकाश यशवंत आंबेडकर
मतदार संघ अकोला (हरलेत)
पक्ष वंचित बहुजन आघाडी
जन्मतारीख 10 मे 1954
पत्ता यशवंत भवन, कृषिनगर, अकोला
इमेल prakashambedkar@gmail.com
संपर्क क्र  9422 85 9580
व्यवसाय वकील
गुन्ह्याची नोंद 0
अपत्य १ मुलगा

चला तर जाणून घेऊया, प्रकाश आंबेडकर याचं शिक्षण किती झालेलं आहे आणि त्यांची एकूण किती संपत्ती आहे?

प्रकाश आंबेडकर यांचे शिक्षण किती ? | Prakash Ambedkar Educational Details 

इ.स. १९७२ मध्ये ते मुंबईतील सेंट स्टॅनीसलायस हायस्कूल मधून प्रकाश आंबेडकर दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर इ.स. १९७८ मध्ये त्यांनी सिद्धार्थ कला महाविद्यालयामधून बी.ए. पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे इ.स. १९८१ मध्ये त्यांनी सिद्धार्थ विधी महाविद्यालयाामधून त्यांनी एलएलबी पदवी मिळवली.

आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न | Total income shown in ITR

  • 2018 – 2019 ~ 8 Lacs+
  • 2017 – 2018  ~ 4  Lacs+
  • 2016 – 2017  ~ 2 Lacs+
  • 2015 – 2016  ~ 3  Lacs+
  • 2014 – 2015 ~ 1 Lacs+

कुटुंबाची माहिती | Family Information

प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत. प्रकाश आंबडेकर यांच्या वडिलांचे नाव यशवंत व आईचे नाव मीराबाई आहे. आंबेडकर कुटुंब हे बौद्ध धर्मीय आहे. प्रकाश आंबेडकर यांचा विवाह २७ नोव्हेंबर १९९३ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अंजली मायदेव यांच्याशी झाला प्रकाश व अंजली या दाम्पत्यांना सुजात नावाचा एकुलता एक मुलगा आहे.

Image is demonstration purpose only

जंगम मालमत्तेचा तपशील | Details of movable Property

  • कॅश –  1 Lacs+
  • बँका डिपॉझिट –  26 Lacs+
  • कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर – 59 Lacs+
  • इन्शुरन्स –  26 Lacs+
  • ज्वेलरी –  7 Lacs+

एकूण जंगम मालमत्ता –  1 Crore+

 अचल मालमत्तेचा तपशील | Details of immovable Property

  • शेतजमीन –  42 Lacs+
  • बंजर जमीन – 1 crore+
  • निवासी इमारती –  3  Crore+

एकूण अचल मालमत्ता  4  Crore+

आंबेडकर यांची एकूण मालमत्ता | Total Property 

  • देय –  0
  • उत्पन्नाचे स्रोत – पेन्शन भारत सरकार आणि Royalty डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तके

एकूण मालमत्ता – 5 Crore+

मार्च २०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार,आंबेडकर यांच्या नावावर ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रूपये इतकी संपत्ती आहे. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.

Image is demonstration purpose only

राजकीय कारकीर्द | Political Carrier 

इ.स. १९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनतर त्यांनी स्वतःचा भारिप बहुजन महासंघ या पक्षाची स्थापना केली. मात्र २०१८ मध्ये त्यांनी जवळपास १०० घटक पक्षांना एकत्र घेत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली .प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर आणि असोउद्दीन ओवेसी एकत्र आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या . वंचितने सर्वच पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले होते . मात्र पुन्हा एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात फाळकत झाली.त्याचा फटका वंचित आघाडीला विधानसभा निवडणुकांमध्ये बसला


हे पण वाचा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *