“Quant Small Cap Fund : चांगल्या परताव्याची हमी, तुमच्या आर्थिक स्वप्नांना आकार द्या!”
Quant म्युच्युअल फंड | उत्कृष्ट म्युच्युअल फंड योजना, SIP वर मिळवा 49.16 लाख रुपये परतावा
Quant Small Cap Fund : शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित पर्याय मानला जातो. इक्विटीशी जोडलेले असल्याने येथे चांगल्या परताव्याची संधी असते. मात्र, गुंतवणुकीसाठी योग्य योजना निवडणे महत्त्वाचे ठरते. म्युच्युअल फंडाच्या योजना चांगल्या पोर्टफोलिओ, कमी खर्चाचे प्रमाण, कमी जोखीम, आणि उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे रेटिंग मिळवतात.

गेल्या १० वर्षांतील ४ किंवा ५ स्टार रेटिंग असलेल्या काही योजना परताव्याच्या बाबतीत आघाडीवर आहेत. या योजनांनी १० वर्षांत एकरकमी गुंतवणुकीवर १८-२२% वार्षिक परतावा, तसेच एसआयपी गुंतवणुकीवर २१-२५% वार्षिक परतावा दिला आहे. एकरकमी गुंतवणुकीतून ७ पट परतावा मिळाल्याचेही दिसून आले आहे. (Quant Small Cap Fund)
Quant Small Cap Fund (रेटिंग: 5 स्टार)
- 10 वर्षांतील एसआयपी परतावा: 26.59% वार्षिक
- मासिक एसआयपी रक्कम: 10,000 रुपये
- दहा वर्षांत एकूण गुंतवणूक: 12 लाख रुपये
- 5 वर्षांनंतर एसआयपीचे मूल्य: 49,16,920 रुपये
- एकरकमी गुंतवणुकीवरील 10 वर्षांचा परतावा: 20.36% वार्षिक
- 10 वर्षांत 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य: 6.38 लाख रुपये
- योजनेची एकूण मालमत्ता (30 नोव्हेंबर 2024): 27,161 कोटी रुपये
- खर्च गुणोत्तर (30 नोव्हेंबर 2024): 1.59%
- लॉन्चिंग तारीख: 29 ऑक्टोबर 1996
- लाँचिंगपासून वार्षिक परतावा: 14.57% (Quant Small Cap Fund)
सूचना: म्युच्युअल फंड व शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. गुंतवणुकीच्या आधी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.