सुप्रिया सुळेना टक्कर देणाऱ्या सुनेत्रा पवार यांची संपत्ती किती?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024) पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली. शरद पवार यांच्या गटाची उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटाने देखील सुनेत्रा पवार यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करत उमेदवारी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी काम सुरु केल्याचे पाहायला मिळत होते.त्यामुळे बारामतीमध्ये खरच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज राष्ट्रवादीच्या दोन्हही गटांनी बारामतीमधील आपले उमेदवार जाहीर केले.
Sunetra Pawar । सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या सुनेत्रा पवार यांच्याबद्दलचा जाणून घेऊया –
सुनेत्रा पवार यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1963 मध्ये धाराशिवमधील तेर या गावामध्ये झालाय. सुनेत्रा पवार यांच्या वडिलांचं नाव बाजीराव भगवंतराव पाटील तर आईचे नाव दौपदी बाजीराव पाटील आहे. -सुनेत्र पवारांचं शिक्षण बॉ. कॉम झालं असून त्यांचा व्यवसाय हा शेती आहे. -त्यांना वाचन, निसर्ग फोटोग्राफी, चित्रकला आणि समाजकार्यमध्ये विशेष आवड आहे. -सुनेत्र पवार यांनी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, बारामती. अध्यक्षा, एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीया (एनजीओ) बारामतीच्या अध्यक्ष आहेत. -त्यासोबतच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्या विश्वस्तही आता आहेत. -सुनेत्रा पवार यांचं आरोग्य क्षेत्रामध्येही योगदान असून यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीर, कर्करोग जनजागृती तसेच मासिका जागर अभियान, महिलांसाठी आरोग्यविषयक शिबीरांचे आयोजन त्यांनी केलं आहे.
Sunetra Pawar । २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार हा मजकूर देण्यात आला आहे, त्यानुसार…
२०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, पवार यांच्या नावे तब्बल २७ कोटीहून अधिक किमतीची मालमत्ता आहे. तर पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे ४७ कोटींहून अधिक रकमेची मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेमध्ये पवारांकडे पुण्यातील २० ठिकाणच्या जमिनी, चार निवासी इमारती व एक कर्मशियल इमारत आहे. तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे ६ शेतजमिनी, २९ भूखंड व तीन निवासी इमारती आहेत
Sunetra Pawar । जंगम मालमत्तेच्या रूपात सुनेत्रा पवार ६१ लाखाचे दागिने, एक ट्रॉली, एक इनोव्हा कार व एक ट्रॅक्टर आहे तर अजित पवार यांच्या नावे दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर व १३ लाखाहून अधिक किमतीच्या सोन्या- चांदीच्या वस्तू आहेत. अजित पवार यांच्याकडे असलेल्या गाड्यांची एकूण किंमत सुमारे ८९ लाख रुपये इतकी आहे. अजित पवार यांनी १ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या नावावर २ कोटी ६८ लाखांचे कर्ज आहे.
दरम्यान, आता नव्याने उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना शासनाकडून दरमहा ३ लाखापर्यंत पगार तसेच मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता आणि सुविधा दिल्या जातील.