सौर कृषी पंप योजना : अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: संपूर्ण मार्गदर्शन
सौर कृषी पंप योजना : योजनेंची ओळख – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध व्हावी, यासाठी सौर पंप प्रदान केले जातील.
योजनेच्या मुख्य वैशिष्ट्ये: या योजनेंतर्गत ३, ५ आणि ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे सौर पंप दिले जाणार आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांना ठराविक टक्केवारी रक्कम भरावी लागेल, उर्वरित खर्च राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिला जाईल.

सौर कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना द्यावयाची रक्कम:
- ३ HP पंप: रु. १७,५०० ते १८,०००
- ५ HP पंप: रु. २२,५००
- ७ HP पंप: रु. २७,०००
पंपाची देखभाल आणि सुरक्षा: योजनेत सहभागी शेतकऱ्यांना ५ वर्षांच्या कालावधीसाठी मोफत देखभाल आणि दुरुस्ती सेवा दिली जाईल. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विमा संरक्षणही उपलब्ध असेल. [सौर कृषी पंप योजना]
लाभार्थी निवडीचे निकष:
- शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत (विहीर, शेततळे, बोअरवेल) असावा.
- यापूर्वी पारंपरिक कृषीपंपाकरिता वीज जोडणी नसावी.
- शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार पंपाची क्षमता ठरवली जाईल:
- २.५ एकरपर्यंत: ३ HP पंप
- २.५ ते ५ एकर: ५ HP पंप
- ५ एकर व अधिक: ७.५ HP पंप
अर्ज करण्याची प्रक्रिया: शेतकरी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट (www.mahadiscom.in) वर ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करू शकतात.
अर्जात समाविष्ट करावयाची माहिती:
- कृषी पंप वीज जोडणीचा पूर्वीचा तपशील (असल्यास)
- शेतकरी व जमिनीचा तपशील
- जलस्रोत व सिंचन सुविधा
- कृषी उत्पादनविषयक माहिती
- विद्यमान व आवश्यक पंपाचे तपशील
- बँक खाते माहिती
आवश्यक कागदपत्रे:
- सातबारा उतारा (शेततळे/विहीर असल्यास त्याची नोंद आवश्यक)
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- अनुसूचित जाती-जमाती प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- सहभोगदार असल्यास ना-हरकत प्रमाणपत्र (₹२०० च्या स्टॅम्प पेपरवर)
अर्ज सादर केल्यानंतरची प्रक्रिया: [सौर कृषी पंप योजना]
- अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला मोबाईलवर लाभार्थी क्रमांक प्राप्त होईल.
- या क्रमांकाचा वापर करून अर्जाची स्थिती पाहता येईल व देय रक्कम भरता येईल.
- १४ मंजूर एजन्सींपैकी कोणतीही एक निवडता येईल.
- एजन्सी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून शेतात सर्वेक्षण केले जाईल.
- सर्व माहिती योग्य असल्यास सौर पंपाची बसवणी केली जाईल.
संपर्क व मदत: ऑनलाईन अर्ज करताना अडचणी आल्यास किंवा सौर पंप दुरुस्ती/विमा संरक्षणासाठी महावितरणच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल:
- १९१२ / १९१२०
- १८००-२१२-३४३५
- १८००-२३३-३४३५
ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी असून, सौर ऊर्जेचा वापर करून स्वयंपूर्ण वीजपुरवठा मिळवण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी वेळ न दवडता अर्ज करावा व या योजनेचा लाभ घ्यावा.
- जबरदस्त डिस्काउंट डिल्ससाठी आम्हाला टेलिग्रामवर जॉईन करा. विविध शॉपिंग ऑफर्स आणि सवलतींवर आम्ही नजर ठेवून असतो व सर्वप्रथम डिस्काउंट पँथर या आपल्या चॅनलवर ते पोस्ट करत असतो. आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी जॉईन लिंक वर क्लिक करा
येथे क्लीक करा जॉईन लिंक
नवीन राजकीय ताज्या अपडेट साठी आणि आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी “मराठी मंडळी” ला आजच सबस्क्राइब करा!
YouTube चॅनेल लिंक [ येथे क्लिक करा ] मराठी मंडळी YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा!
“आपली भाषा, आपली संस्कृती, आपली ओळख – मराठी मंडळी!” ❤️

