Ladki Bahin Yojana 8th Installment: “लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता कधी मिळणार? संपूर्ण माहिती व महत्त्वाचे अपडेट्स”
लाडकी बहीण योजना: फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
Ladki Bahin Yojana 8th Installment: महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक मदत दिली जाते. योजनेचा लाभ नियमित मिळत असल्याने आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याबाबत माहिती:
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली ही योजना मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली. लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा आर्थिक सहाय्य जमा केले जात आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता वेळेवर वितरित झाल्यानंतर, जानेवारीचा हप्ता देखील जमा करण्यात आला. आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत उत्सुकता आहे. [Ladki Bahin Yojana 8th Installment]

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होईल?
या योजनेचा प्रारंभ जुलै महिन्यात झाला असून, आतापर्यंत एकूण सात हप्ते (जुलै ते जानेवारी) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योजनेच्या निधीचे वितरण प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर सुरू होते. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता देखील 15 तारखेनंतर जमा होण्याची शक्यता आहे.
₹2,100 मिळण्याबाबत अपडेट: Ladki Bahin Yojana 8th Installment
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने निवडून आल्यास या मानधनात वाढ करून ₹2,100 करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर सरकार स्थिरावल्याने यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात या वाढीची तरतूद केली जाण्याची शक्यता असून, नव्या आर्थिक वर्षापासून लाभार्थ्यांना दरमहा ₹2,100 मिळू शकतात.
लाडकी बहीण योजनेंतर्गत रक्कम परत जमा करावी लागणार?
निवडणूक संपल्यानंतर काही माध्यमांमध्ये लाभार्थी महिलांकडून रक्कम परत घेण्याच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, राज्याच्या महिला व बालविकास विभागाने यावर स्पष्टता दिली आहे. विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी सांगितले की, महिलांकडून मिळालेली रक्कम परत घेण्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही आणि अशी कोणतीही योजना शासनाच्या विचाराधीन नाही. Ladki Bahin Yojana 8th Installment
महत्वाची सूचना:
लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याची नियमित तपासणी करावी आणि योजनेशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- जबरदस्त डिस्काउंट डिल्ससाठी आम्हाला टेलिग्रामवर जॉईन करा. विविध शॉपिंग ऑफर्स आणि सवलतींवर आम्ही नजर ठेवून असतो व सर्वप्रथम डिस्काउंट पँथर या आपल्या चॅनलवर ते पोस्ट करत असतो. आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी जॉईन लिंक वर क्लिक करा
येथे क्लीक करा जॉईन लिंक
नवीन राजकीय ताज्या अपडेट साठी आणि आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी “मराठी मंडळी” ला आजच सबस्क्राइब करा!
YouTube चॅनेल लिंक [ येथे क्लिक करा ] मराठी मंडळी YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा!
“आपली भाषा, आपली संस्कृती, आपली ओळख – मराठी मंडळी!” ❤️

