NewsPolitics

गोपीचंद पडळकर यांची संपूर्ण माहिती

गोपीचंद पडळकर( Gopichand Padalkar) यांनी तीन पक्षांचा प्रवास केलेला आहेत. चार वेळेस ते निवडणुकीत पराजित देखील झालेले आहेत. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांचं नाव महाराष्ट्राला परिचित झालं. फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव जानकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी जानकर यांच्यासोबत मिळून आरक्षण आंदोलनाला बळ दिलं.पडळकरांचा राजकारणाव्यतिरिक्त पडळकरांना सिनेमाची आवड आहे. ऐन लोकसभा निवडणुक 2019च्या तोंडावरच त्यांनी धुमस नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी सिनेमाचं लेखन आणि अभिनय केलेला आहे.

Image is demonstration purpose only

गोपीचंद पडळकर यांची वैयक्तिक माहिती Gopichand Padalkar Personal Information :
नाव गोपीचंद कुंडलिक पडळकर
मतदार संघ विधानपरिषद आमदार
पक्ष भाजपा
जन्मतारीख 1982
पत्ता पडळकरवाडी, पिंपरी बीके. ता.आटपाडी जि.सांगली
इमेल gopichandpadalkar99@gmail.com
संपर्क क्र 9970521003
व्यवसाय शेती व समाजसेवा
गुन्ह्याची नोंद 9

आता आपण गोपीचंद पडळकर यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊयात Educational Details :

  • 12 वी पास, कस्तुरबा वालचंद कॉलेज,
  • सांगली 2001 मध्ये
  • 38 वर्षीय गोपीचंद पडळकर यांचं शिक्षण 12 वी पर्यंत झालेलं आहे

आयटीआर मध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न Total Details Shown In ITR :

  • Nil

Image is demonstration purpose only

जंगम मालमत्तेचा तपशील Details Of Movable Property :

  • कॅश – 1 Lakhs+
  • बँका, नॉन-बँकिंग ठेवी – 28 Thous+
  • कंपन्यांमध्ये बाँड आणि शेअर – Nil
  • इन्शुरन्स – nil
  • वाहन : टोयाटा fortuner,  10 Lakhs+
  • ज्वेलरी – 80 Thous+

एकूण जंगम मालमत्ता – 12 Lakhs+

Image is demonstration purpose only

अचल मालमत्तेचा तपशील Details Of Inmovable Property :

  • शेतजमीन – 35 Lakhs+
  • बंजर जमीन – 30 Lakhs+
  • व्यावसायिक इमारती – nil
  • निवासी इमारती – 10 Lakhs+

एकूण अचल संपत्ती – 75 Lakhs+

गोपीचंद पडळकर यांची एकूण मालमत्ता :

  • देय – 4 Lakhs+
  • उत्पन्नाचे स्रोत  – शेती

एकूण मालमत्ता – 87 Lakhs+

Image is demonstration purpose only

राजकीय कारकीर्द Political Career :
विधानसभा निवडणूक 2019 पूर्वी एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला होता.” ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं राहायचं असतं. माझी इच्छा अशी आहे की गोपीचंद पडळकर यांनी बारामतीची सीट लढली पाहिजे,” असं फडणवीस त्यावेळी म्हणाले होते.या प्रवेशापूर्वी पडळकर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये होते. याच पक्षाकडून त्यांनी सांगली लोकसभा लढवली. या दरम्यान, भाजप सरकारने धनगरांना ST आरक्षण दिलं नाही, म्हणून पडळकरांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं.”धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गात करून आरक्षण लागू झालं नाही तर महाडमधून अंदाजे 20-25 लाख धनगर लोक आपल्या शेळ्या, मेंढ्या, गुराढोरांसह मोर्चा काढतील आणि विधानभवनावर धडकतील,” असा इशारा पडळकर यांनी भाजपला दिला होता.
खरं तर गोपीचंद पडळकर यांनी 2018 च्या जुलै महिन्यात वंचितमध्ये प्रवेश केला होता. पुढे त्यांना सांगली लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. त्या आधी 2013 ते 2018 दरम्यान ते भाजपमध्ये होते. 2009 ते 2013 दरम्यान ते राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते.
वंचित बहुजन आघाडीला सोडत असताना पडळकर यांनी भाजप सरकारच्या कामावर समाधानी असल्याचं सांगितलं होतं.पक्ष बदलण्याच्या या सवयीमुळेच पडळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे. पण धनगर समाजाच्या हितासाठीच हे निर्णय घेतल्याचं पडळकर नेहमी सांगताना दिसतात.


हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *